Whats new

MPSC

इतिहास

भूगोल

भारतीय राज्यघटना व पंचायतराज

सामान्य विज्ञान

अर्थशास्त्र

अंकगणित


चालू घडामोडी

MPSC

एमपीएससी महत्वाचे...
राज्यसेवा परीक्षा
पोलीस उपनिरीक्षक (PSI) अराजपत्रित
विक्रीकर निरीक्षक (STI)
अराजपत्रित
सहायक (ASST) अराजपत्रित
राज्याची प्रशासन व्यवस्था
मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र

PSI (पूर्व) परीक्षेची तयारी कशी कराल?

मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता खालीलपैकी कोणत्या घटकावर जास्तीत जास्त भर द्यावा म्हणजे स्कोरिंग वाढेल, हे ध्यानात येईल. याविषयी सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

 • 1. चालू घडामोडी :
  यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, नियुक्त्या, बक्षिसे व पारितोषिके, सन्मान इत्यादी घटकांचा समावेश करता येईल. याकरिता वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, साप्ताहिके, मासिके इत्यादी प्रसार माध्यमांचा उपयोग करावा. तसेच नाथे प्रकाशनाचे 'चालू घडामोडी' हे पुस्तक वाचावे. तसेच साप्ताहिक 'रोजगार नोकरी संदर्भ'तही वेळोवेळी चालू घडामोडी विषयी माहिती दिली जाते. त्याचाही सविस्तर अभ्यास करावा.
 • 2. नागरिकशास्त्र :
  यामध्ये राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, परिशिष्टे, महत्त्वाची कलमे, संसद, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, न्यायसंस्था, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांची कार्ये व अधिकार यावर प्रश्न विचारल्या जातात. याकरिता नाथे प्रकाशनाने अलीकडेच प्रसिद्ध केलेले 'भारतीय राज्यघटना व पंयायतराज' हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. याशिवाय संबंधित परीक्षेत स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलकी व पोलीस प्रशासन या भागावर प्रश्न विचारण्यात येतात.
 • 3. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास :
  1857 पासून तर 1947 पर्यंत सर्व ऐतिहासिक म्हणजे भारतातील गव्हर्नर, गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय यांचा कार्यकाळ व त्यांच्या कार्यकाळातील घटना. याकरिता प्रा. संजय नाथे लिखित 'आधुनिक भारताचा इतिहास' हे पुस्तक वाचावे. या विषयाचा अभ्यास करताना 1857 च्या उठावाची कारणे वगैरे, म्हणजेच थोडे मागे जावे लागेल. मात्र जास्तीत जास्त भर 1857 नंतर झालेल्या घटनांवरच द्यावा. अलीकडे आयोगाने महाराष्ट्रातील इतिहासावर प्रश्न विचारणे सुरू केले आहे. त्या प्रश्नाचे स्वरूप प्रस्तुत प्रश्नपत्रिकेत अभ्यासता येईल. त्यासाठी उमेदवाराने अभ्यासक्रमाला अनुसरून बी.ए. ची पुस्तके अभ्यासावीत.
 • 4.  भूगोल : (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)
  भूगोल या विषयाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष भर द्यावा. शिवाय, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश – रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान व तापमान, प्रमुख पिके, प्रमुख शहरे, नद्या, उद्योग – धंदे, इत्यादी उपघटकांचाही सविस्तर अभ्यास करावा. भूगोलाचा अभ्यास करताना जग, भारत तसेच महाराष्ट्राचा नकाशा समोर ठेवावा. त्यामुळे एकदा वाचलेले किंवा पाहिलेले चिरकाल स्मरणात राहील.
  भूगोलाचा अभ्यास करताना 8 वी, 9 वी, 10 वी ची भूगोलाची पुस्तके तसेच पर्जन्यमान, प्रमुख पिके व उद्योगधंदे हे बदलणारे घटक असल्यामुळे चालू वर्षाचे नाथे प्रकाशनाचे 'भूगोल प्रश्नपत्रिका' हे पुस्तक वाचावे. यासाठी प्रा. संजय नाथे लिखित 'कला शाखा घटक' हे पुस्तकही अत्यंत उपयुक्त ठरेल.
 • 5.  अर्थव्यवस्था :
  अर्थविषयक घटकांची व्याप्ती फार मोठी आहे. मात्र PSI/STI/ASST या पदांकरिता अभ्यास करताना जास्तीत जास्त पंचवार्षिक योजनावरच भर द्यावा. कारण मागील वर्षीचे पेपर पाहिले असता जवळपास प्रश्न पंचवार्षिक योजनेवरच विचारलेले आढळतात. मात्र त्याकरिता नियोजन मंडळाच्या स्थापनेपासून तर बाराव्या पंचवार्षिक योजनापर्यंत पूर्ण अभ्यास करावा. या विषयाचा अभ्यास उमेदवाराने तुलनात्मक करावा. अलीकडे योजना आयोगाऐवजी नीती आयोगाची स्‍थापना करण्यात आली असल्यामुळे उमेदवारांनी नीती आयोगाचा सविस्तर अभ्यास करणे अधिक सोयीस्कर ठरेल.
 • 6.  सामान्य विज्ञान :
  यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यावर प्रश्न विचारले जातात. याकरिता 8, 9, 10 वी ची पुस्तके अत्यंत उपयोगी ठरतील. तसेच नाथे प्रकाशनाचे ‘स्पर्धा परीक्षा सामान्य विज्ञान’ हे पुस्तकही उपयुक्त ठरेल.
  विद्यार्थी या विषयाच्या घोकंमपट्टीवर भऱ देतात. परिणामी ऐन वेळेवर गोंधळ होतो. अचूक उत्तर कोणते विद्यार्थी ओळखू शकत नाही. तसेच घोकंमपट्टी करून अभ्यासलेला प्रश्न
  दुस-या पद्धतीने विचारला गेला तरी विद्यार्थी गोंधळतो. त्यामुळे या विषयाचा सर्वंकष अभ्यास करावा. दैनंदिन विज्ञानावर विशेष भर द्यावा.
 • 7.  बुद्धिमापन चाचणी व अंकगणित :
  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक प्रमाण, गुणोत्तर, शेकडेवारी इत्यादी धड्यांवर येथे प्रश्न विचारण्यात येतात. याकरिता जास्तीत जास्त उदाहरणे सोडवून पाहण्याचा सराव करावा. या विषयाला घाबरण्याचे काही कारण नाही. शेवटी हाच विषय पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊन विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरवू शकतो. यासाठी प्रा. संजय नाथे लिखित 'सुलभ अंकगणित' हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. तसेच बुद्धिमापन या विषयाच्या संपूर्ण अभ्यासासाठी नाथे प्रकाशनाचेच 'सुलभ बुद्धिमत्ता चाचणी' हे पुस्तक अभ्यासावे.

Ankaganit Questions Rupee Symbol   50/-  ,  Validity 4 Months

History Questions Rupee Symbol  50/-  ,  Validity 4 Months

Bhartiya Rajyaghatna Va Panchayatraj Questions Rupee Symbol  50/-  ,  Validity 4 Months

Samanya Gyan Questions Rupee Symbol  25/-  ,  Validity 3 Months

Economics Questions Rupee Symbol  25/-  ,  Validity 3 Months

Chalu Ghadamodi Questions Rupee Symbol   40/-  ,  Validity 3 Months

Samaj Sudharak Questions Rupee Symbol  25/-  ,  Validity 3 Months

Bhugol Questions Rupee Symbol  30/-  ,  Validity 3 Months