Whats new

इस्रायलमध्ये आंतरराष्ट्रीय कृषिमेळा

येथील कन्व्हेक्शन सेंटरमध्ये जगभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा तीन दिवसीय कृषिमेळा मंगळवारपासून सुरू झाला. आंतरराष्ट्रीय शेती प्रदर्शन असे त्याचे स्वरूप असले तरी शेतीपुढील आव्हानांचा त्यामध्ये अभ्यास केला जाणार आहे. पीक काढणी पश्चात नुकसान कसे कमी करता येईल, असा यंदाच्या प्रदर्शनाचा मुख्य गाभा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून हे प्रदर्शन पाहण्यासाठी आणि इस्रायली प्रगत शेती तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी सुमारे पाचशेहून अधिक शेतकरी येथे आले आहेत. महाराष्ट्रातील नावाजलेला उद्योगसमूह असलेल्या जैन इरिगेशन कंपनीची इस्रायलमधील नादांन-जैन कंपनी या प्रदर्शनाची मुख्य प्रायोजक आहे.