Whats new

ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर ब्रॅड हॅडिनचा वनडे क्रिकेटला अलविदा

ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर, फलंदाज ब्रॅड हॅडिनने वनडे इंटरनॅशनल क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हॅडिनच्या निवृत्तीची माहिती दिली आहे. वेस्ट इंडिज आणि ब्रिटनच्या टेस्ट दौऱ्यापूर्वी त्याने ही घोषणा केली.

 37 वर्षीय हॅडिनने जानेवारी 2001 मध्ये वनडे करिअरला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने 126 वनडे सामने खेळले आहेत. 2015 मधील वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचाही तो भाग होता. त्याने वनडे कारकीर्दीमध्ये 170 झेल घेतले आहेत. गिलख्रिस्ट आणि इयान हिलीनंतर हॅडिन सर्वात यशस्वी विकेटकीपर म्हणून ओळखला जातो.

 हॅडिनने 31.53 च्या सरासरीने 3122 धावा ठोकल्या आहेत. 110 ही हॅडिनची सर्वोत्तम धावसंख्या आहे.