Whats new

दुबईत साकारणार पहिले वहिले अंडरवॉटर टेनिस कोर्ट

टेनिसच्या खेळाचा आनंद आता थेट पाण्याखालून खेळाडू आणि टेनिसप्रेमींना घेता येणार आहे. पोलंडमधील आर्किटेक्‍ट क्रिस्तोफ कोटाला यांच्या प्रयत्नांतून हे पहिले वहिले अंडर वॉटर टेनिस कोर्ट साकारले जाणार आहे. जगातील सर्वांत उंच इमारत आणि पहिले अंडर वॉटर रेस्टॉरंट असणाऱ्या दुबईत हे पहिले अंडर वॉटर टेनिस कोर्ट उभे राहील


अद्‌भुत अशा या प्रयोगामुळे अंडर वॉटर होणारा टेनिसचा खेळ प्रेक्षकांना पाण्याखालून, तसेच पाण्यावरूनही बघता येईल. वरसॉ येथे स्वतःचा स्टुडियो असणाऱ्या कोटला यांनी स्थानिक खेळाडूंच्या मदतीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. दुबईतील बुर्ज अल अरब स्कायस्क्रॅपर येथे हे पाण्याखालील कोर्ट उभारले जाईल. हे टेनिस कोर्ट उभारण्यासाठी 108 फूट लांब आणि 32 फूट उंच काचेचा "डोम‘ तयार केला जाईल

कोटला म्हणाले,"या प्रकल्पासाठी कुणीही स्वतंत्र गुंतवणूक केलेली नाही. पाण्याखाली टेनिस कोर्ट उभारण्याची कल्पना पूर्णपणे माझी असून, त्यासाठी मीच वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. आखाती देशात टेनिसची लोकप्रियता चांगली असल्यामुळे आपण या प्रकल्पासाठी दुबईची निवड केली

< < Prev Next >>