Whats new

दक्षिण कोरिया देणार भारताला १० अब्ज डॉलर

 

भारतातील पायाभूत क्षेत्राचा विकास, स्मार्ट शहरे, रेल्वे, विद्युतनिर्मिती यासह विविध क्षेत्रांच्या विकासासाठी भारत व दक्षिण कोरिया यांनी परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला असून, दक्षिण कोरियाने भारताला १० अब्ज डॉलर देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने दक्षिण कोरियात आले आहेत. मोदी व दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष पार्क ग्यून ह्ये यांनी विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. परस्पर संबंध वरच्या पातळीवर नेण्यासाठी संरक्षण, व्यापार व गुंतवणूक हे मुद्दे आधीच्या सहकार्यात मिळवण्याचा निर्णय या दोन नेत्यांनी घेतला आहे. अध्यक्ष पार्क व पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी दक्षिण कोरियाच्या प्रगतीची प्रशंसा केली. दक्षिण कोरियाच्या जलद विकासामुळे आशियायी शतक अधिक बळकट झाल्याचे मोदी यांनी सांगितले. भारत व दक्षिण कोरिया यांच्यात सात करार झाले असून, त्यात दुहेरी कर टाळण्याचा डीटीएए हा करारही करण्यात आला आहे. अध्यक्ष पार्क व पंतप्रधान मोदी यांच्या वाटाघाटीनंतर एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून, दक्षिण कोरिया हा भारताच्या अ‍ॅक्ट इस्ट मोहिमेतील अत्यावश्यक भागीदार आहे अशी नोंद यात करण्यात आली आहे.

< < Prev Next >>