Whats new

मोदी सरकारची 'सुवर्ण' योजना, सोन्यावर बँकेत करमुक्त व्याज

देशभरात तब्बल ६० लाख कोटी रुपयांचे सोने घरांमध्ये तसेच विविध संस्थाकडे पडून असून, ते वापरात   आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक योजना आणली आहे. बँकामध्ये सोने ठेवल्यास त्यावर कोणताही कर नसलेले व्याज मिळणार असून, किमान ३० ग्रॅम सोने बँकेत ठेऊन बचत खाते सुरू करता येणार आहे.

एखादी व्यक्ती किंवा संस्थेला त्यांच्याकडील अतिरिक्त सोने भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) अधिकृत हॉलमार्किंग केंद्रांकडून मूल्यांकन करून बँकांमध्ये ठेवता येईल. किमान एक वर्षासाठी हे 'सुवर्ण बचत खाते'
सुरू करता येणार असून, त्यावर पैसे किंवा सोन्याच्या रूपात व्याज मिळवता येईल. मात्र, व्याजदराबाबतचा
निर्णय बँकांवर सोडण्यात येणार आहे.

Next >>