Whats new

स्मार्ट सिटीनंतर आता राज्यात स्मार्ट ग्राम

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे. खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी उचललेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल असून सुरुवातीला १० स्मार्ट ग्रामची उभारणी केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

ही कल्पना पुढे आल्यानंतर पहिले स्मार्ट ग्राम माळीण असावे, हा विचार समोर आला. ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी माळीणला नुकतीच भेट दिली. शहरांवरील वाढता भार कमी करायचा असेत तर खेडी समृद्ध करणे आणि खेड्यांमध्येही उपजिविकेची साधने उपलब्ध होऊ शकतात, हा विश्वास निर्माण करण्याचा स्मार्ट ग्रामचा उद्देश असल्याचे मुंडे म्हणाल्या.

योजनेची पंचसूत्री

एस फॉर सॅनिटेशन (स्वच्छता), एम - मॅनेजमेंट/मॉडर्नायझेशन (व्यवस्थापन), ए - अकाउंटॅबिलिटी (उत्तरदायित्व), आर - रिन्युएबल एनर्जी (अपारंपरिक ऊर्जा) व टी- ट्रान्सपरेन्सी ही स्मार्ट ग्रामची पंचसूत्री असेल.