Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

अॅस्ट्रोसॅटची वर्षअखेरीस अवकाश झेप

अॅस्ट्रोसॅट इस्रोची पहिली अंतराळ वेधशाळा

अवकाशीय वस्तूंच्या अभ्यासासाठी समर्पित पहिल्या खगोलीय मिशनअंतर्गत प्रक्षेपित केला जाणारा अॅस्ट्रोसॅट हा उपग्रह अवकाशात झेपावण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला असून, त्याच्या सर्व प्रणालींचा अभ्यास केला जात आहे. या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात हा उपग्रह अवकाशात झेपावेल.

पीएसएलव्ही पेलोड लावल्यानंतर या उपग्रहाची तांत्रिक योग्यता तपासण्याचे काम यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती इस्रोच्या वेबसाईटवर दिली आहे. पीएसएलव्ही, सी-३४ प्रक्षेपकाद्वारे तो पृथ्वीच्या कक्षेत सोडला जाईल. तो ६५० कि.मी. उंचीवर भूमध्यरेखीय कक्षेजवळ स्थिरावेल. गेल्या आठवड्यात उपग्रहाला पूर्णपणे संकलित केल्यानंतर सर्व परिमाणे अचूकरीत्या काम करीत आहेत. येत्या काही दिवसांत प्रक्षेपणासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रावर नेण्यापूर्वी विद्युत चुंबकीय अडसर, विद्युत चुंबकीय योग्यता, औष्णिक पोकळी, कंपन, आवाजाशी संबंधित चाचण्या पार पाडल्या जातील. अल्ट्राव्हायोलेट, ऑप्टिकल, निम्न आणि उच्च ऊर्जा एक्स-रे व्हेवबँडवर एकाचवेळी निरीक्षण करण्याची या उपग्रहाची क्षमता असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

अॅस्ट्रोसॅट ही इस्रोची पहिली अंतराळ वेधशाळा असेल. या उपग्रहाच्या सर्व यंत्रणा सुरळीतरीत्या काम करीत असून सर्व उपकरणे आणि सहायकप्रणाली व्यवस्थितरीत्या काम करीत आहे. येत्या काही दिवसांत प्रक्षेपणासंबंधी सर्व चाचण्या पूर्ण केल्या जातील. या उपग्रहावर चार एक्स-रे मशीन, अल्ट्राव्हायोलेट दुर्बीण, एक चार्ज पार्टिकल मॉनिटर लावला आहे.

इस्रोसह टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, भारतीय खगोलभौतिकी संस्था, खगोल आणि खगोलभौतिकी आंतरविद्यापीठ केंद्र तसेच रमण संशोधन संस्थेनेही या उपग्रहाच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. कॅनडाची अंतराळ संस्था आणि ब्रिटनच्या लिसेस्टर विद्यापीठाच्या मदतीने दोन उपकरणे तयार करण्यात आली आहेत.