Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

STD नंबरही डायल करा ‘डायरेक्ट’

मोबाइलवरून दूरच्या गावी किंवा अन्य राज्यांत एसटीडी करताना आता मोबाइल नंबरआधी ० किंवा +९१ डायल करण्याची गरज पडणार नाहीए. प्रमुख मोबाइल कंपन्यांनी, एसटीडी मोबाइल नंबरवर कॉल करण्याची प्रक्रिया सोपी करण्याचं काम सुरू केल्यानं देशभरात मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या, आपल्या मोबाइलवरून 'होम नेटवर्क'च्या बाहेरच्या मोबाइल नंबरवर कॉल करताना ० किंवा +९१ डायल करून मग पुढचा नंबर लावावा लागतो. ही पद्धत, मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीतील एक मोठी अडचण आहे. आपला मोबाइल नंबर ज्या सर्कलमधला आहे, (महाराष्ट्र सर्कल, मुंबई सर्कल) त्या सर्कलमधलाच ऑपरेटर एमएनपी करताना निवडावा लागतो. म्हणजेच, मुंबई सर्कलमधील मोबाइल नंबर असलेली व्यक्ती महाराष्ट्र सर्कलमध्ये गेली, तर तिला पोर्टेबिलिटी सुविधेचा फायदा घेत येत नाही. तिला पोर्टेबिलिटीसाठी मुंबई सर्कलमधील ऑपरेटरच निवडावा लागतो. ही कटकट लवकरच मिटणार आहे.

देशभरात मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी लागू करण्यासाठी टेलिकॉम खात्यानं ३ मेची 'डेडलाइन' दिली होती. परंतु, नेटवर्कमध्ये काही तांत्रिक बदल करणं गरजेचं असल्याचं सांगत, टेलिकॉम कंपन्यांची संघटना असलेल्या 'सीओएआय'नं ही मुदत दोन महिने वाढवून मागितली होती. या बदलांचाच भाग म्हणून, एसटीडी मोबाइल नंबरच्या आधी ० किंवा +९१ डायल करण्याची आता गरज उरलेली नाही. त्यामुळे आता सर्व क्रमांक एकाच पद्धतीनं डायल करता येतील. एमएनपीच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा बदल आहे.