Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

मे अखेर पूर्ण होणार डॉ. बाबासाहेबांच्या निवास खरेदीची प्रक्रिया

 

संग्रहालय बनविणार : 'लंडन स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स'मध्ये अध्यासन सुरू करण्याचा प्रस्ताव

 
 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने विशेष महत्त्व प्राप्त झालेली इंग्लंडमधील लंडन शहरातील वास्तू खरेदी करण्याची प्रक्रिया मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.  महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाच दिवसीय लंडन दौरा पूर्ण करून ना. बडोले २९ ला मुंबईत परतले. या दौर्‍यात सदर वास्तू खरेदीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया त्यांनी मार्गी लावली. त्याबाबत माहिती देताना बडोले यांनी सांगितले, १९२0 ते २२ या कालावधीत बाबासाहेब लंडनमध्ये असताना याच घरात वास्तव्यात होते. 
उच्च शिक्षण घेण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीने ते इंग्लंडला गेले होते. या घरी वासतव्यास असतांनी लंडन विद्यापीठातून बी.एस.सी केले. ‘The Problem of Rupee’ या प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस.सी) ही पदवी मिळाली. त्यांनी याच वर्षी बॅरीस्टरची परीक्षा सुध्दा याच ठिकाणी राहून पास केली. अश्या या महान वास्तुचे संग्रहालय आणि वाचनालय तयार करण्याचे भारत सरकारने ठरविले आहे. या संग्रहालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या आठवणी व इतर त्यांचे साहित्य संग्रहित केल्या जाईल. या शिवाय एका मंजल्यावर भारतीय पर्यटकांना राहण्याची व्यवस्‍था करण्यात येईल. ज्या लंडन स्कूल ऑफ एकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतले त्या संस्‍थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्‍थापन करण्यात येईल.

--------------------

Foto File Name : National film Award

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे थाटात वितरण

‘कोर्ट’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘ख्वाडा’, ‘किल्ला’ अशा अनेक मराठी चित्रपटांनी रविवारच्या ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर आपली मोहोर उमटवली. चैतन्या ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठीपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचे सुवर्णकमळ देऊन गौरविण्यात आले. ‘क्वीन’मधील अभिनयासाठी कंगना राणावत हिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

येथील विज्ञात भवनात एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व भाषांत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘कोर्ट’ला सुवर्णकमळ व अडीच लाख रुपये रोख रुपये देऊन गौरविण्यात आले. ‘एलिझाबेथ एकादशी’ यास सर्वोत्कृष्ट बालचित्रपट, ‘किल्ला’ला विशेष उल्लेखनीय चित्रपट, रवी जाधव दिग्दर्शित ‘मित्रा’स सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठीच्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड देऊन गौरविले. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘हैदर’ने सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार व सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी असे पाच पुरस्कार आपल्या झोळीत टाकले.

< < Prev Next >>