Whats new

म्युचुअल फंड 'रिस्कोमीटर' 1 जुलै पासून लागू

म्युचुअल फंडामध्ये रिस्कोमीटरच्या वापरासाठी अॅम्फीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारतीय शेअर बाजार नियामक असणार्‍या ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया‘ने (सेबी) नुकतेच विशिष्ट कर्ज-रोखे म्युच्युअल फंड (डेट म्युच्युअल फंड) धोका व्यवस्थापन नियमात बदल केले आहेत. म्युच्युअल फंडमधील जोखीम दाखवण्यासाठी यापूर्वी रगांनुसार जोखीम दाखवली जात होती. त्यात पुर्वी फक्त तीन (3) पातळ्यांमध्येच जोखीम दर्शविली जात होती. परंतु आता सेबीने जोखीम पातळ्यांमध्ये वाढ केली आहे. सामान्य गुंतवणूकदारांना कलर कोडिंगमुळे बर्‍याचदा जोखीम ओळखण्यात अडचण येते. त्यामुळे आता जोखीम दाखवण्यासाठी पाच (5) पातळ्या (लेवेल्स) निश्चित करण्यात आल्या आहेत.
1- मुद्दालावर कमी जोखीम
2- मुद्दालावर माफक प्रमाणात कमी जोखीम
3- मुद्दालावर मध्यम धोका
4- मुद्दालावर माफक प्रमाणात पण उच्च धोका (जोखीम)
5- मुद्दालावर उच्च धोका
त्यामुळे आता म्युच्युअल फंडावर विशिष्ट धोका पातळी रगांनुसार चित्रण दर्शविले जाणार नसून "रिस्कोमीटर" दाखवण्यात येणार आहे. हे नवीन परिपत्रक 1 जुलै 2015 पासून लागू करण्यात येणार आहे. गुंतवणूक केलेल्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी आणि रोखे बाजार नियंत्रित करण्याच्या उद्देशाने काही बदल करण्यात आले आहेत. अॅम्फीने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे फंड हाउस तातडीने लागू करणार आहेत.