Whats new

मुंबई इंडियन्स पुन्हा आयपीएल चॅम्पियन 2015

मुंबई इंडियन्सने तिसर्‍यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळताना दुसरे विजेतेपद पटकावले, तर सहा वेळा अंतिम फेरीत खेळलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला चौथ्यांदा विजेतेपदाच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबईची अंतिम फेरीत तीनही वेळा चेन्नई सुपरकिंग्जशी लढत झाली. मुंबईला २0१0 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, मात्र २0१३ आणि २0१५ मध्ये विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे. मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने यंदाचे विजेतेपद महत्त्वपूर्ण अशासाठी आहे की, सुरुवातीला हा संघ सलग चार पराभवांमुळे तळाला फेकला गेला होता. मुंबईने दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. तिसर्‍यांदा ही स्पर्धा जिंकण्याचे धोनीच्या चेन्नई संघाचे स्वप्न भंग करत मुंबईने अटकेपार झेंडा फडकावला आहे. २0१३ नंतर दुसर्‍यांदा ही स्पर्धा जिंकण्याची किमया मुंबई संघाने साधली आहे.  

* सामनावीर : रोहीत शर्मा  

* मालिकावीर : अँड्रे रसेल 

* ऑरेंज कॅप : डेव्हिड वार्नर 

* पर्पल कॅप : डी. ब्राव्हो 

* उगवता खेळाडू : श्रेयस अय्यर 

* महागडा खेळाडू : अँड्रे रसेल