Whats new

जगात सर्वाधिक वाघ चंद्रपुरात, भारतात 2226 तर अन्य 12 देशांत केवळ 700 वाघ

दुर्मिळ होत चाललेला वाघ प्राण्याची प्रजात आता जगभरात केवळ भारतासह 13 देशात आढळत आहे. यात सर्वाधिक वाघ 2,226 भारतात आहेत. तर उर्वरित 12 देशांत केवळ 700 वाघ आहेत. वाईल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्टच्या सर्वेनुसार, मध्य भारतातील ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आणि परिसरातील जंगलात 718 वाघ आहेत. सुमारे पाच महिने चाललेल्या हा सर्वे देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्वे मानला जात आहे. वाईल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया यांनी सांगितले की, ट्रस्ट देश व अन्य 18 राज्यांतही वन्यजीव अभ्यासाची तयारी करण्यात येत आहे.

दोन हजार चौरस किमीमध्ये 6 हजार कॅमेरे-

दोन हजार चौरस किलोमीटर परिसरात सर्व प्रकारचे वन्यजीवांची संख्या जाणून घेण्यासाठी सहा हजार कॅमेरे लावण्यात आले आहेत. म्हणजेच दीड किलोमीटर चौरस भागात दोन कॅमेरे लावले आहेत.

चंद्रपुरात 123 वाघ, 178 बछडे-

वाघाची संख्या मोजताना त्यांच्या तीन वर्षाच्या आतील बछड्यांना सामील केले जात नाही. चंद्रपुरमधील ताड़ोबा-अंधारी टायगर प्रोजेक्टमधील प्रमुख भागात 60 आणि बफर झोनमध्ये 15 वाघ आहेत. या दोन्ही क्षेत्रात 68 बछडे कॅमे-यात आढळून आले आहेत. सुरक्षित ठिकाणाशिवाय अन्य ठिकाणीही 48 वाघ आणि 110 वाघांची बछडी असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात 190 वाघ आहेत.