Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

संगकारा सर्वोत्तम क्रिकेटपटू

भारताचा शैलीदार फलंदाज अजिंक्य रहाणे याची सीएट सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली तर श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा हा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरविला गेला. 
भारताचे माजी कसोटीपटू व कर्णधार कपिल देव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोलकाता येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात २६४ धावांची विक्रमी खेळी करणारा रोहित शर्मा याला या विक्रमाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे सीएट पुरस्कारांचे १९ वे वर्ष आहे. रहाणेने यावेळी सांगितले की, 'लॉर्डसवर भारताच्या विजयात मोलाचे ठरलेले शतक हे आपल्या कारकीर्दीतले विशेष असे शतक आहे. 
सीएट पुरस्कार विजेते
जीवनगौरव पुरस्कार : कपिल देव

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू :  कुमार संगकारा 
सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू :  अजिंक्य रहाणे 
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज :  हाशिम अमला 
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज :  रंगना हेरथ 
सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटू : ड्वेन ब्राव्हो

लोकप्रिय खेळाडू : कायरान पोलार्ड  
विशेष पुरस्कार :  रोहित शर्मा 
स्थानिक सर्वोत्तम क्रिकेटपटू : आर. विनयकुमार 
युवा क्रिकेटपटू :  दीपक हुडा