Whats new

पंतप्रधान मोदींच्या हस्ते "डी. डी. किसान”चे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'डी. डी. किसान’ या 24 तास चालणाऱ्या कृषिविषयक वाहिनीचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान  म्हणाले की, "देशातील कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणे आवश्‍यक असून, खेड्यांचा विकास झाला तरच शहराचा विकास होईल. कृषितील उत्पन्न वाढल्यास एकूण उत्पन्नामध्येही वाढ होईल. या स्वतंत्र वाहिनीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती होण्यास हातभार लागेल.” दरम्यान, ‘डी. डी. किसान’ या वाहिनीला केंद्र सरकारने 'मस्ट कॅरी’ वाहिनीच्या श्रेणीमध्ये टाकले आहे. त्यामुळे ऑपरेटर्संना ही वाहिनी ग्राहकांना उपलब्ध करून देणे अनिवार्य असेल. सध्या 25 विविध वाहिन्यांचा 'मस्ट कॅरी’ श्रेणीमध्ये समावेश असल्याचे दूरदर्शनच्या अधिकाऱ्याने सांगितले.