Whats new

फोर्ब्सच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत 4 भारतीय

फोर्ब्स‘ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील 100 सर्वांत प्रभावशाली महिलांमध्ये चार भारतीय महिलांचाही समावेश आहे. या यादीत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर आहेत. फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील शंभर प्रभावशाली महिलांची यादी जाहीर करण्यात येते. यंदा प्रसिद्ध झालेल्या यादीत भारतातील चार महिला आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधति भट्टाचार्य (30 व्या स्थानी), आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर (35 व्या स्थानी), बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार-शॉ (85 व्या स्थानी) आणि हिंदुस्तान टाईम्स माध्यम समुहाच्या अध्यक्षा शोभना भारतीया (93 व्या स्थानी) यांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या या यादीत भारतीय वंशाच्या इंदिरा नुयी (पेप्सिकोच्या अध्यक्षा) आणि पद्मश्री वॉरियर (सिस्को टेक्नॉलॉजीच्या प्रमुख) याही आहेत. फोर्ब्सच्या आज 12 वी वार्षिक यादी प्रसिद्ध केली आहे. अँजेला मर्केल यांच्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या हिलरी क्लिंटन दुसऱ्या स्थानी, दानकर्त्या मेलिंडा गेट्स व फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जॅनेट येलेन तिसऱ्या स्थानावर आहेत.