Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सावकारांचे व्याजदर निश्चित

शासनाने अधिकृत सावकारांकडून वितरित होणाऱ्या कर्जाचे व्याजदर निश्चित केले असून बिगर शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे व्याजदर ठरविण्यात आले आहेत. निर्धारित दरापेक्षा अधिक व्याजदर आकारल्यास परवानाधारक सावकारावर कठोर कारवाई केली जाणार आहे. मुंबई सावकारी अधिनियम १९४६ हा कायदा निरसित करण्यात आला आहे. आता त्याऐवजी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ लागू करण्यात आला आहे. अवैध सावकारीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे, अवैध सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता करणे आदींबाबत यात स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना त्वरित व कमी व्याजदरात कर्जपुरवठा होण्यासाठी सावकारी व्यवसायासाठी परवाना देण्याची तरतूद नवीन अधिनियमातही करण्यात आली आहे. त्या अन्वये अधिकृत सावकार शेतकरी व बिगर शेतकऱ्यांना कर्ज वितरित करू शकतो. तारण कर्जावर बिगर शेतकऱ्यांना १५ टक्के व्याज दर तर बिगर तारण कर्जावर १८ टक्के व्याज दर आकारले जाणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी तारण कर्जाला नऊ टक्के आणि बिन तारण कर्जावर १२ टक्के व्याज दर आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त परवानाधारक सावकार जास्तीचे व्याज घेत असल्यास परवानाधारक सावकारावर कठोर कारवाई केली जाणार आहे.