Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

स्विस बँकेत खाती असणाऱ्या पाच भारतीयांची नावे जाहीर

स्विस बँकेत खाती असणाऱ्या आणखी पाच भारतीयांची नावे जाहीर करण्यात आली असून, भारतीय उद्योजक यश बिर्ला यांचा त्यात समावेश आहे. स्विस राजपत्रात या महिन्यात जगभरातील अशी ४० नावे प्रसिद्ध करण्यात आली असून, आणखीही काही नावे प्रसिद्ध केली जाण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मुंबईतील लिमोसिन घोटाळ्यातील दोघांसह पाच भारतीयांची नावे स्वित्झर्लंडच्या अधिकृत राजपत्रात जाहीर करण्यात आली असली तरी त्यांची चौकशी भारतात होईल. स्विस बँकेच्या यादीत असणाऱ्या इतर दोघांत बांधकाम व्यवसायातील पाँटी चढ्ढा यांचे जावई गुरजितसिंग कोचर व दिल्लीतील  उद्योजिका रितिका शर्मा (ब्लेसिंग्ज अ‍ॅपरल) यांची नावे आहेत. स्वित्झर्लंडच्या सरकारी कर प्रशासनाने (एफटीए) यापैकी काही नावे आधीच भारताला कळविली होती. स्रेहलता साहनी व संगीता साहनी यांची नावे अशाच पद्धतीने जाहीर करण्यात आली होती.