Whats new

500 गावांत पीक विमा योजना राबवणार

वेधशाळेच्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात ९३ टक्के पाऊस होणार असून, त्यानुसार जिल्हा यंत्रणांनी संबंधित जिल्ह्यातील पावसाचा अंदाज घेण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिला. राज्यात ग्रामपंचायत स्तरावर २०५९ पर्जन्यमान केंद्र उभारण्यात येतील. तसेच ५०० गावांमध्ये पीक तसेच मिळणाऱ्या उपग्रहाद्वारे माहितीच्या आधारे विमा योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.