Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत ९६२ कोटींची वाढ

महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या १५० कोटी इतक्या कायमच्या मर्यादेत जास्तीच्या ९६२ कोटी रुपयांची तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या नुकसान भरपाईसाठी ६३०.७४ कोटी रुपये, फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये झालेला अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी २८१ कोटी आणि जलयुक्त शिवार अभियानासाठी जलसंधारण विभागास अतिरिक्त ५० कोटी रुपये निधी देण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. या निधीची मर्यादा १५० कोटी असून त्यात ही अतिरिक्त ९६२ कोटी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचा आकस्मिक निधी हा मुंबई आकस्मिकता अधिनियम १९५६ अन्वये स्थापन करण्यात आला आहे. दिनांक ११ एप्रिल १९९० पासून याची कायमस्वरूपी मर्यादा १५० कोटी रुपये आहे. या मर्यादेत तात्कालिक कारणांमुळे (उदा. नैसर्गिक आपत्ती निवारण खर्च, धोरणात्मक निर्णयापोटी करावयाचा नवीन खर्च) वेळोवेळी तात्पुरती वाढ करावी लागते.