Whats new

दोषींना गोपनीय पद्धतीने फाशी देता येणार नाही - सुप्रीम कोर्ट

गुन्ह्यात दोषी ठरलेल्या लोकांचाही आत्मसन्मान असतो, त्यांना ताबडतोब किंवा गोपनीय पद्धतीने फाशी दिली जाऊ शकत नाही, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. दोषी ठरलेल्यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायला परवानगी दिली पाहिजे, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. एखाद्याला फाशीची शिक्षा सुनावल्यावर संविधानातील कलम २१ नुसार जीवन जगण्याचा अधिकार लगेच संपत नाही. त्या व्यक्तीच्या आत्मसन्मान व प्रतिष्ठेचे रक्षण केलेच पाहिजे, असेही कोर्टाने नमूद केले.