Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनाही नोकऱ्या, राज्यभर अनेक जागांसाठी परीक्षा

महाराष्ट्रभरात विविध शासकीय जागांसाठी परीक्षा होणार आहेत. यामध्ये अगदी दहावी झालेल्या विद्यार्थ्यांपासून पदवीधर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दहावी आणि बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फॉरेस्ट विभागात गार्डच्या, तर एमपीएससीमध्ये स्टेनोग्राफरच्या जागा उपलब्ध आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीमध्ये सहायकपदाच्या ९६ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी किंवा तत्सम शिक्षणप्राप्त विद्यार्थी २ जूनपर्यंत अर्ज करू शकतात. महाराष्ट्र वन विभागामध्ये फॉरेस्ट गार्डसाठी दहावी तसेच बारावी झालेले कोणतेही विद्यार्थी १० जूनपर्यंत अर्ज करू शकतात. फॉरेस्ट गार्डच्या एकूण ८१ जागा उपलब्ध आहेत. यानंतर एमपीएससीमध्ये स्टेनोग्राफरच्या जागांसाठी दहावी आणि बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी ८ जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत. स्टेनोग्राफरच्या एकूण ४९ जागा या विभागात उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवाची अट नाही. त्यामुळे फ्रेशरदेखील या जागांसाठी अर्ज करू शकतात. नेमून दिलेल्या संकेतस्थळांवर जाऊन विहित तारखेच्या आत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.