Whats new

म्हैसूरचा नवा राजा, शिक्षण अमेरिकेत, वय केवळ 23 वर्ष

'सिटी ऑफ पॅलेस'अशी ओळख असलेल्या म्हैसूर शहराला आज नवीन राजा मिळाला आहे. 23 वर्षीय यदुवीर कृष्णदत्त वडियार आता म्हैसूरच्या राजघराण्याचे 27 वे राजे म्हणून ओळखले जातील.

यदुवीर कृष्णदत्त वडियार यांचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे. यदुवीर वडियार यांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी श्रीकांतदत्ता नरसिंहा वडियार हे राजगादीवर विराजमान होते, परंतु 2013 मध्ये त्यांचं निधन झालं. 

सोहळ्यासाठी म्हैसूर पॅलेसमध्ये राजघराण्याचं पारंपारिक सिंहासनही सजवण्यात आलं होतं. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख पुजाऱ्यांनी राजे यदुवीर यांचा हात धरुन सिंहासनावर बसवलं. त्यानंतर राणी प्रमोदादेवी यांनी यदुवीर यांना शाही चांदीचा मुकुट परिधान केला आणि संपूर्ण म्हैसूर पॅलेसमध्ये उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

या शाही सोहळ्यासाठी देशभरातील राजघराण्यातील 1200 सदस्य आणि कर्नाटकच्या प्रमुख राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती.