Whats new

अभिनव बिंद्रा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र

भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने म्युनिच येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर रायफल प्रकारात सहावा क्रमांक मिळवला. यामुळे रियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीचा कोटा त्याने पूर्ण केला असून तो ऑलिम्पिकसाठी पात्र होणारा चौथा नेमबाज ठरला आहे.

अभिनव बिंद्राच्या अगोदर भारताच्या गगन नारंग, जीतू राय आणि अपूर्वी चंदेला यांनी ऑलिम्पिकसाठीच्या पात्रतेचा कोटा पूर्ण केला आहे. नारंगने महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे विश्वकप ५० मीटर एअर रायफल स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता. चंदेलाने कोरिया येथे झालेल्या विश्वकप दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तसेच जीतू रायने मागीलवर्षी स्पेनमधील ग्रेनाडा विश्वचषक स्पर्धेत ५० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक पटकावून ऑलिम्पिकचा कोटा पूर्ण केला होता.