Whats new

स्वच्छ महाराष्ट्रासाठी ‘सप्तपदी स्वच्छतेची’ हे अभियान, आमीर खान ब्रँड अँबेसिडर

स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी ‘सप्तपदी स्वच्छतेची’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. अभिनेता आमीर खान या अभियानाचा ब्रँड अँबेसिडर असून मुंबईत आज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. 

विकासाच्या वाटचालीत स्वच्छता अतिशय महत्वाची असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. तसंच आमीर खानसोबत दुष्काळावर चर्चा झाली असून, जलयुक्त शिवार योजनेसाठी आमीर मदत करायला तयार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.