Whats new

कॅबिनेट सचिवपदी प्रदीपकुमार सिन्हा

उत्तर प्रदेशचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार सिन्हा यांची कॅबिनेट सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. सध्याचे कॅबिनेट सचिव अजित सेठ हे निवृत्त होत असून, सिन्हा हे 13 जूनपासून पदभार सांभाळतील. सिन्हा हे 1977 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पदभार स्वीकारेपर्यंत सिन्हा यांची कॅबिनेट सचिवालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासही मोदी यांनी मान्यता दिली आहे. सिन्हा यांच्याकडे जुलै 2013 पासून ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी आहे.