Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात मेवेदर ठरला किंग

 

अमेरिकेतील लासवेगास येथे बॉक्सिंगमधील महामुकाबल्यात अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉईड मेवेदरने बाजी मारली आहे. फिलिपीन्सचा बॉक्सिंगपटू मॅनी पॅकियाओचा पराभव करत मेवेदरने सहा कोटींचा बेल्ट व ९५० कोटी रुपयांच्या पारितोषिकावर नाव कोरले आहे. 

लास वेगास येथील एमजीएम ग्रँड मरिना येथे बॉक्सिंगमधील ६७ किलो वजनीगटासाठी महामुकाबला रंगला. अमेरिकेचा ३८ वर्षीय बॉक्सिंगपटू मेवेदर विरुद्ध फिलिपीन्सचा मॅनी पॅकियाओ यांच्यात हा महामुकाबला रंगला. या सामन्यासाठी सुमारे 400 मिलीयन डॉलर्सचे पारितोषिक होते. हा ऐतिहासिक महामुकाबला बघण्यासाठी  १७ हजार प्रेक्षक उपस्थित होते. १२ फे-यांमध्ये ३६ मिनीटे रंगलेल्या या महामुकाबल्यात सुरुवातीला पॅकियाओने मेवेदरला चांगलीच लढत दिली. मात्र शेवटच्या काही फे-यांमध्ये मेवेदरने सर्वोत्तम खेळी करत पॅकियाओला धूळ चारली. सामना गमावूनही पॅकियाओला ६३६ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले. मेवेदर हा बॉक्सिंगमधील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला असून त्यांची संपत्ती आता २७ अब्ज रुपये ऐवढी झाली आहे. 

< < Prev Next >>