Whats new

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतात होणार अंडर-१७ फिफा विश्वचषक

भारतात होणारी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात होणार असून, यातील सहापैकी चार ठिकाणांना मंजुरी देण्यात आली आहे. स्पर्धा संयोजन समितीने ही माहिती दिली.

स्पर्धा संयोजक जेव्हियर सेपी पत्रकार परिषदेत म्हणाले, या चार ठिकाणांत मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम, गुवाहाटी, कोलकाता आणि कोची यांचा समावेश आहे. आणखी तीन ठिकाणांची निवड होणार असून, गोवा, चेन्नई, दिल्ली, बंगलोर किंवा पुणे यातून निवड होणार आहे. त्याचबरोबर इंडियन सुपर लीग स्पर्धेसाठी या स्पर्धेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचेही सेपी यांनी यावेळी स्पष्ट केले.

सेपी म्हणाले, ‘एआयएफएफशी केलेल्या विचारविनिमयानंतरच स्पर्धेचा कालावधी ठरवण्यात आला आहे. आम्हाला माहीत आहे की, आयएसएल व आय लीग स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. मात्र, भारतात ८७ वर्षांनंतर १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा होत आहे.’