Whats new

गतिमान एक्स्प्रेस: पहिली सेमी हायस्पीड रेल्वे

देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे गतिमान एक्स्प्रेस दिल्ली - आग्रा मार्गावर सुरु होणार आहे. या रेल्वेचा वेग ताशी 160 किलोमीटर असेल. दोनवेळा रेल्वेची चाचणी झाली आहे.

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीआरएस) परवानगी मिळणे बाकी आहे . दिल्ली - आग्रा मार्गावर बहुतेक ठिकाणी संरक्षक उपाय योजले गेले आहेत. त्याशिवाय सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गात सिग्नल अपग्रेड केले जात आहेत. या मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे यशस्वी झाल्यानंतर इतर नऊ मार्गांवर ही सेवा चालवण्याची रेल्वेची योजना आहे. त्यात कानपूर-दिल्ली, चंदीगड-दिल्ली, हैदराबाद-चेन्नई, नागपूर-बिलासपूर, गोवा-मुंबई, नागपूर-सिकंदराबाद यांचा समावेश होणार आहे.

रेल्वेची वैशिष्ट्य
> 5400 हॉर्स पॉवरचे इंजन
> 12 मॉर्डन कोच असतील
> 160 किमी ताशी वेग
> 105 मिनीटात 200 किमी अंतर कापणार
> 9 इतर मार्गांवर धावणार रेल्वे
> 25 टक्के जास्त दर शताब्दी एक्स्प्रेसच्या तिकीट दरांपेक्षा