Whats new

मॅगी प्रकरणी कंपनीवर खटला, अमिताभ, माधुरी, प्रीती झिंटावर गुन्हा

मॅगी नूडल्समध्ये प्रमाणापेक्षा १७ पटींनी जास्त मोनोसोडियम ग्लुटामेट व शिसे आढळल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांच्याविरुद्ध आरोग्याला अपाय करणाऱ्या खाद्यपदार्थांचा प्रचार केल्याचा गुन्हा दाखल झाला. उत्तर प्रदेशात बाराबंकीच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी अॅड. संतोष सिंह यांच्या तक्रारीवर ही कारवाई केली.

अमिताभ, माधुरी व प्रीती हे जाहिरातींतून मॅगी नूडल्स आरोग्यासाठी पोषक असल्याचा प्रचार करत मुलांच्या आरोग्याशी खेळले, असा आरोप तक्रारीत आहे. दरम्यान, मॅगी तयार करणाऱ्या नेस्ले इंडियासह अन्य पाच जणांविरुद्ध उत्तर प्रदेशच्या अन्न सुरक्षा व औषधी प्रशासनाने स्वतंत्र गुन्हा दाखल केला. कंपनीचा हिमाचलातील ऊना कारखाना, बाराबंकीतील ईझी-डे स्टोअर, ईझी-डे कंपनी व त्यांच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल झाला.