Whats new

भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती यापुढे ‘समरसता दिन’

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त यापुढे १४ एप्रिल हा ‘राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

डॉ. आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीत महाराष्ट्रातून भन्ते राहुल बोधी, राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव व डिक्कीचे संस्थापक मिलिंद कांबळे यांचा समावेश आहे. वर्षभरात डॉ. आंबेडकरांच्या स्मरणार्थ नाणे व टपाल तिकिटाचे लोकार्पण करण्यात येईल.