Whats new

प्रार्थनाने पटकावला ITF चा किताब; करिअरमध्ये पहिल्यांदा महिला दुहेरीचे विजेतेपद

भारतीय फेड कप खेळाडू प्रार्थना ठोंबरे हिने आपली ब्रिटिश जोडीदार हॅरीयेट डार्ट हिच्या साथीने आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत विजेतेपद पटकावले. प्रार्थना ठोंबरे आणि हॅरीयेट यांनी अंतिम सामन्यात थायलंडच्या निशा एल. व एल. लुआंगनाम या जोडीचा ६-४, ४-६, १८-१६ असा पराभव केला. हैदराबादेत सानिया मिर्झा अकॅडमीत सराव करणाऱ्या महाराष्ट्रातील बार्शीच्या प्रार्थना हिने या हंगामात अहमदाबाद येथे २५,००० डॉलर स्पर्धेच्या दुहेरीतही उपविजेतेपद मिळवले होते.