Whats new

देवदत्त नागे तंबाखूविरोधी मोहिमेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

‘जय मल्हार’ फेम अभिनेता देवदत्त नागे याला ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान, पुणे आणि सलाम मुंबई या व्यसनविरोधी फाऊण्डेशनकडून 'अॅण्टी टोबॅको' म्हणेजच तंबाखूविरोधी कॅम्पेनसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्यात आलं आहे. या कॅम्पेनद्वारे देवदत्त तंबाखूचा वापर कसा हानिकारक ठरु शकतो याबाबत जनजागृती करणार आहे.

व्यसनाच्या आहारी जायचं असेल तर ते व्यसन सकस आहार आणि व्यायामाचं असावं, तंबाखूसारख्या जीवाची हानी करणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन टाळा आणि सृदृढ आयुष्य जगा असं देवदत्तचं म्हणणं आहे. यापूर्वी मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याची महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती कार्याचा प्रचार करण्यासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाली होती.