Whats new

भारतीय कुस्तीपटूंना चार सुवर्ण; मुंबईकर नरसिंग यादव अव्वल

योगेश्वर दत्तसह भारताच्या चार कुस्तीपटूंनी इटली येथील सस्सारी शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेत सुवर्णपदकांची कमाई केली. योगेश्वरने ६५ किलोवजनी गटात, प्रविण राणाने ७० किलो वजनी गटात बाजी मारली. अमित कुमार आणि मुंबईकर नरसिंग यादव यांनीही अनुक्रमे ५७ व ७४ किलो वजनी गटात जेतेपद पटकावले. या स्पर्धेत मौसूम खत्री (९७ किलो) आणि हितेंदर (१२५ किलो) हेही जेतेपदाच्या शर्यतीत आहे.
 वजनी गटातील बदलांनंतर योगेश्वरने आत्तापर्यंत सहभाग घेतलेल्या चारही स्पर्धामध्ये सुवर्ण जिंकण्यात यश मिळवले आहे. योगेश्वरने गतवर्षी याच स्पध्रेत सुवर्णपदक जिंकून नवीन वजनी गटातील आपली छाप सोडण्यास सुरुवात केली. कुल आणि इंचीयोनमध्ये झालेल्या आणि त्यानंतर ग्लासगोत झालेल्या आशियाई स्पध्रेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते.