Whats new

दीपिका कुमारीला कांस्य

अंताल्या, टर्की येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात दीपिका कुमारीने कांस्यपदकाची कमाई केली. दीपिकाने महिला रिकर्व्ह प्रकारात दक्षिण कोरियाच्या चांग ह्य़ू जिन वर ६-२ अशी मात करत दीपिकाने हे यश मिळवले.

तिरंदाजी विश्वचषकातील पदक दीपिकाच्या अविरत मेहनतीचे फळ आहे.त तिरंदाजी विश्वचषकातले दीपिकाचे हे दुसरे पदक आहे. याआधी शांघाय येथे २०१३ मध्ये झालेल्या विश्वचषकात दीपिकाने रौप्यपदकाची कमाई केली होती.

रिओ ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर, सर्वच भारतीय तिरंदाजपटूंचा सराव सुरू झाला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सातत्याने वाहणारा वारा आणि अन्य परिस्थितीशी जुळवून घेता न आल्याने तिरंदाजांना रित्या हातानेच परतावे लागले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये हे चित्र बदलण्यासाठी तिरंदाजपटू सज्ज झाले आहेत.