Whats new

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला आठ सुवर्णपदके

भारतीय मल्लांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळविले.इटलीत सासरी सिटी येथे झालेल्या या स्पर्धेत मल्लांनी सुवर्ण पदकांची कमाई केली. त्याचबरोबर रजनीश याने 65 किलो वजनी गटात ब्रॉंझपदकाची कमाई केली. वजनी गटात बदल करूनही योगेश्वर दत्त आणि नरसिंग यादव यांची कामगिरी विशेष लक्षणीय ठरली. या स्पर्धेत वजनी गट बदलल्यानंतर झालेल्या प्रत्येक स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळविले आहे. या स्पर्धेत सोनू (६१ किलो), सोमवीर (८६ किलो), मौसम खात्री (९७ किलो), हितेंदर (१२५ किलो) यांनी पदकांची कमाई केली. त्यापूर्वी अमित कुमार (५७ किलो), योगेश्वर दत्त (६५ किलो), प्रवीण राणा (७० किलो), नरसिंग यादव ( ७४ किलो) यांनी सुवर्ण पदक मिळविले होते.