Whats new

रवी शास्त्री भारतीय संघाचे हंगामी प्रशिक्षक

बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियांच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवी शास्त्रींना संजय बांगर, बी. अरुण आणि आर. श्रीधर यांची साथ असेल. बीसीसीआयने याबाबतची घोषणा केलेली आहे.

संजय बांगर हे फलंदाजी प्रशिक्षक, बी. अरूण गोलंदाजी प्रशिक्षक आणि आर. श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील.

 क्रिकेट वर्ल्डकपनंतर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा करार संपला आहे त्यामुळे टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक कोण याबाबत बीसीसीआय चर्चा करत आहे.

 येत्या १० जूनपासून भारत आणि बांगलादेश मधली या दौऱ्यातील एकमेव कसोटी सुरु होणार आहे.  त्यानंतर  18 जूनला पहिला वनडे, त्यानंतर 21 आणि 24 जूनला पुढील वन डे सामने खेळवण्यात येतील.