Whats new

हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकुर

हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकुर यांची चौथ्यांदा निवड झाली आहे.  2000 सालापासून ते चौथ्यांदा अध्यक्षपद भूषवित आहेत.

सोमवारी येथे झालेल्या हिमाचलप्रदेश क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनुराग ठाकुर यांची एकमताने अध्यक्षपदासाठी निवड जाहीर करण्यात आली.