Whats new

प्रभात पुरस्कारांवर ‘एक हजाराची नोट’ची मोहोर

ऑनलाईन मतदानावर मिनिटामिनिटाला उत्कंठा वाढविणाऱ्या प्रभात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना “जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. इतर पुरस्कारात ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाने मोहोर उमटविली आहे .

फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय) मधील प्रभात कंपनीच्या म्युझियममध्ये जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते “जीवनगौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.