Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

‘इस्रो’ केंद्रांना नवे संचालक

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) तिरुअनंतपुरम येथील द्रव इंधन प्रणाली केंद्र (एलपीएससी), विक्रम साराभाई अवकाश केंद्र (व्हीएसएससी) आणि श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्र (एसडीएससी) या तीन महत्त्वाच्या केंद्राच्या नव्या संचालकांनी सोमवारी पदभार स्वीकारला. 
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. शिवन यांनी विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदाची सूत्रे एम. चंद्रदत्तन यांच्याकडून स्वीकारली. चंद्रदत्तन या महिन्यात निवृत्त होत आहेत. डॉ. शिवन हे यापूर्वी 'इस्रो'च्या द्रव इंधन प्रणाली केंद्राचे संचालक होते. 
ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. सोमनाथ यांनी 'इस्रो'च्या द्रव इंधन प्रणाली केंद्राच्या संचालकपदाची सूत्रे सोमवारी स्वीकारली. सोमनाथ यांनी यापूर्वी विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे सहाय्यक संचालक (प्रकल्प), तसेच 'जीएसएलव्ही एमके-३'चे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले आहे. शास्त्रज्ञ पी. कुन्हीकृष्णन यांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अकाश केंद्राच्या संचालकपदाची सूत्रे डॉ. एम. वाय. एस. प्रसाद यांच्याकडून स्वीकारली. डॉ. प्रसाद या महिन्यात निवृत्त होत आहेत. पी. कुन्हीकृष्णन यापूर्वी विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे उपसंचालक होते. 
कुन्हीकृष्णन यांनी त्रिवेंद्रम येथील इंजिनीअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये बी-टेक पदवी घेतली. १९८६मध्ये ते 'इस्रो'त दाखल झाले. विविध प्रक्षेपकांच्या इलेक्ट्रॉनिक इंटिग्रेशनसंदर्भात त्यांनी योगदान दिले आहे.