Whats new

सचिन-लक्ष्मण-गांगुली भारतीय क्रिकेटचे सल्लागार

भारतीय क्रिकेट मंडळ तसेच टीम इंडिया यांच्या प्रगतीसाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या तिघांची नवी सल्लागार समिती स्थापन केली. भारतीय क्रिकेटच्या देवांमध्ये समावेश असणाऱ्या या तिघा दिग्गजांनी ही जबाबदारी स्वीकारण्याची अनुमती दिली आहे.

या समितीवर परदेश दौऱ्यांसाठी भारतीय संघ तयार करण्याची जबाबदारी असेलच, पण त्याच बरोबर देशांतर्गत क्रिकेटचा ढाचा अधिक सक्षम करण्यासही ते मदत करतील.