Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

विंडोज टेन विनामूल्य उपलब्ध

विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असलेल्या जगभरातील युजर्ससाठी 29 जुलैपासून 'विंडोज टेन’ विनामूल्य उपलब्ध होणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या वतीने त्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. अलीकडेच यापूर्वीच्या ‘विंडोज’ व्हर्जनमधून वगळण्यात आलेल्या स्टार्ट मेन्युचा ‘विंडोज टेन’ मध्ये पुन्हा समावेश करण्यात आला आहे. 
स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तसेच अधिकाधिक युजर्सपर्यंत पोचण्यासाठी मायक्रोसॉफ्टने जानेवारीमध्ये विंडोज 7 आणि विंडोज 8.1 वापरकर्त्यांसाठी विनामूल्य अपग्रेडेशनची सुविधा देण्याची जानेवारीमध्ये घोषणा केली होती. “विंडोज टेन” हे होम, मोबाईल, प्रो, एंटरप्राईज आणि एज्युकेशन एडिशनमध्ये उपलब्ध आहे. लॅपटॉप्स आणि अन्य डिव्हाईसेसमध्ये वापरता येणाऱ्या “विंडोज टेन” मध्ये नव्या सुविधांसह विंडोज एज ब्राऊजर, चेहरा ओळखण्याची सुविधा, बोटाच्या ठशांद्वारे लॉगीनची सुविधा यासह फोटो, नकाशे, मेल, कॅलेंडर आदींसाठी विविध विंडोज ऍप्सही असणार आहेत.