Whats new

दहशतवाद्यांच्या धमकीमुळे तस्लिमा नसरीन अमेरिकेच्या आश्रयाला

अल कायदाशी संबंधीत दहशतवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन भारत सोडून अमेरिकेच्या आश्रयाला गेल्या आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशात मुस्लिम कट्टरवादाविरोधात ब्लॉगिंग करणाऱया दोन लेखकांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तस्लिमा नसरीन यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. बांगलादेशातील मुस्लिम कट्टरवाद्यांच्या भीतीने तस्लिमा 1994 मध्ये भारताच्या आश्रयाला आल्या होत्या.