Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

ब्लॅटर यांचा फिफा अध्यक्षपदाचा राजीनामा

फुटबॉलची जागतिक संघटना असलेल्या फिफावर सातत्याने होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अखेर सेप ब्लॅटर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चार दिवसांपूर्वीच ब्लॅटर यांची पाचव्यांदा फिफाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

ब्लॅटर यांनी ज्युरिख येथे पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केली. भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर अमेरिकेच्या एफबीआयने स्वित्झर्लंड पोलिसांच्या मदतीनेसहा दिवसांपूर्वी ज्युरीख येथील एका हॉटेलवर छापा मारून फिफाच्या सात अधिकाऱ्यांना अटक केली होती.

दरम्यान, युरोपातील फुटबॉल समुह देश फिफासोडून वेगळी जागतिक फुटबॉल संघटना तयार करण्याचा विचार करीत आहेत. 2018 रोजी रशियात होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला युरोपातील फुटबॉल समुह देशांचा असलेला विरोध हे देखील ब्लॅटर यांच्या राजीनाम्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

येत्या नोव्हेबर, डिसेंबरमध्ये फिफाची निवडणूक होत आहे. मात्र, त्यापूर्वीच ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.