Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

बाजारातून मॅगी काढून घेण्याचा 'नेस्ले'चा निर्णय

दिल्लीसह देशभारतील अनेक राज्यं आणि लष्करानेही मॅगी नूडल्सवर घातलेल्या बंदीनंतर उत्पादक कंपनी असलेल्या 'नेस्ले'नेच देशभरातून 'मॅगी' काढून घेण्याचा निर्णय घेतला असून बाजारातून मॅगीचे स्टॉक्स परत मागवले आहेत. कंपनीने एका पत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केला असला तरी 'मॅगी' संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करत लवकरच बाजारात परत येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मॅगी नूडल्समध्ये प्रमाणापेक्षा अधिक शिसे आढळल्याने वाद निर्माण झाला होता. मॅगीचे नमुने सदोष आढळल्यानंतर केरळ, दिल्लीपाठोपाठ गुरुवारी तामिळनाडू, गुजरात, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांनीही मॅगीवर तात्पुरती बंदी लादली. याच पार्श्वभूमीवर नेस्लेने बाजारूतन मॅगीची पाकिट परत मागवली आहेत

काय आहे नियम- १. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स रूल्स २०११ नुसार चव वाढवणारे एमएसजी (मोनोसोडियम ग्लूटमेट) १२ महिन्याच्या मुलांना नाही द्यायला पाहिजे. २. ५० खाद्य पदार्थांवर एमएसजीच्या वापरावर रोख आहे. ३. नवजात शिशूंच्या मिल्क प्रॉडक्ट्समध्ये ०.२ पीपीपी (पार्ट्स प्रति मिलियन) पेक्षा जास्त एमएसजीची परवानगी नाही आहे. ४. खाद्य पदार्थ (चहा, बेकिंग पाउडर, डीहाइड्रेटेड कांदा, ड्राइड हर्ब्स इत्यादी) मध्ये एमएसजीची मात्रा अधिकतम १० पीपीएम असू शकते. 

 काय आहे शिसे? खरं तर, एमएसजी (मोनोसोडियम ग्लूटमेट) एक असा तत्त्व आहे ज्यामुळे आमच्या नर्वस सिस्टम उत्तेजित होतो. याचे सेवन केल्याने भोजन जास्त स्वादिष्ट लागायला लागतं. इंडियन-चाइनीज फूडमध्ये याचा वापर जास्त होतो. खाद्य पदार्थांची चाचणी करणारी अमेरिकी एजेंसीनुसार हे सेफ मानले जाते. हे मीठ, काळे मिरे, सिरका आणि बेकिंग पाउडरमध्ये देखील उपस्थित असते. एवढंच नव्हे तर टोमॅटो, मशरुम आणि चीजमध्ये पण ग्लूटमेट असते. मोनो सोडियम आणि ग्लूटमेटचे मिश्रणच

एमएसजी बनते तेही यासाठी कारण ग्लूटमेटमध्ये सोडियम नसतो. सोडियम मिळाल्याने याचे रूप मिठासारखे होते, जो टेस्टमेकरचे काम करतो.