Whats new

भारतातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं तिकीट जगात सर्वात स्वस्त

बुलेट ट्रेनच्या आगमनाच्या बातमीनेही भारतीय सुखावले आहेत. आता या आनंदात आणखी भर टाकणारी बातमी म्हणजे भारतातली ही पहिली वहिली  बुलेट ट्रेन जगातली सर्वात स्वस्त ट्रेन असणार आहे.

भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. या मार्गासाठी २८०० रुपयांचं तिकीट आकारल्या जाण्याचा अंदाज आहे. जपान मध्ये ७१३ किमी अंतरासाठी ८००० रुपये आकारले जातात.

भारतातल्या बुलेट ट्रेनची काही वैशिष्ट्ये

 १. मुंबई-अहमदाबाद मार्गावर १० स्टेशन्स असतील. ज्यासाठी ९८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

 २. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेन ही जगातली सर्वात स्वस्त हाय स्पीड ट्रेन असेल.

 ३. या मार्गावर चालणाऱ्या अन्य एसी ट्रेन्स (रुपये १८९५) च्या तुलनेत बुलेट ट्रेनचं तिकीट फक्त दीडपट जास्त असेल.

 ४. सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या ट्रेन्स ५३४ किमीचं अंतर ८ तासात पार करतात, तर बुलेट ट्रेन हे अंतर २ तासात कापेल.