Whats new

आता धास्ती ‘मर्स’ची...

सार्स, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू यानंतर आता मर्स (एमईआरएस - मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) या नव्या विषाणूने आशियात, विशेषतः दक्षिण कोरियात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या विषाणूची बाधा झाल्याने तेथे आतापर्यंत तीन व्यक्ती मरण पावल्या असून, बाधित व्यक्तींची संख्या ३५ वर गेली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्या देशातील सुमारे ७०० शाळा तूर्त बंद करण्यात आल्या आहे. एक बाधित व्यक्ती गोल्फ खेळायला गेल्याबद्दल आणि एक तर चीनमध्ये निघून गेल्याबद्दल दक्षिण कोरियाच्या आरोग्य यंत्रणेवर बेफिकिरी केल्याचा आरोप होत आहे.

'मर्स'विषयी...

'मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम' (एमईआरएस) या रोगामुळे ताप येणे, श्वसनाला त्रास होणे, न्यूमोनिया किंवा किडनी फेल होणे आदी प्रकार होऊ शकतात.