Whats new

'फिफा' फुटबॉल क्रमवारीत भारताची प्रगती

‘फिफा‘च्या ताज्या क्रमवारीमध्ये जगज्जेत्या जर्मनीने अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. बेल्जियमने आतापर्यंतचे त्यांचे सर्वोच्च मानांकन गाठताना दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. भारतीय संघानेही सहा क्रमांकांची प्रगती केली. आता जागतिक फुटबॉल क्रमवारीमध्ये भारत १४१ व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी भारत १४७ व्या स्थानावर होता. फुटबॉल खेळणाऱ्या आशियाई देशांच्या यादीत भारत २२ व्या क्रमांकावर आहे. आशियाई संघांमध्ये इराणला (४१ वा क्रमांक) सर्वोच्च स्थान आहे. त्यांच्याखालोखाल जपान (५२) आणि दक्षिण कोरिया (५८) हे देश आहेत.

‘फिफा‘ची ताजी क्रमवारी

जर्मनी

बेल्जियम

अर्जेंटिना

कोलंबिया

ब्राझील

नेदरलँड्‌स

पोर्तुगाल

उरुग्वे

फ्रान्स

स्पेन