Whats new

आरती कुलकर्णी यांच्या ‘नातं पश्चिम घाटाशी’ लघुपटाला पर्यावरण खात्याचा पुरस्कार

आयबीएन लोकमतच्या सीनिअर एडिटर आरती कुलकर्णी यांच्या ‘नातं पश्चिम घाटाशी’ या लघुपटाला महाराष्ट्राच्या पर्यावरण खात्याचा पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घोषित केलेल्या पर्यावरण विषयक माहितीपटाच्या स्पर्धेत या लघुपटाला दुसरा पुरस्कार मिळालाय. पश्चिम घाटातल्या सहा राज्यांचा प्रवास करून हा माहितीपट बनवण्यात आलाय. पश्चिम घाटाची जैवविविधता, संवर्धनाचे प्रश्न आणि त्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न यामध्ये मांडण्यात आले आहेत.