Whats new

मेडिकलमध्ये केवळ औषधेच

देशभरातील औषधांच्या दुकानात (मेडीकल स्टोर्स) मध्ये यापुढे औषधांव्यतिरिक्त अन्य उत्पादने विकता येणार नाही. लहान मुलांसाठीचे साबण, पावडर, बेबी फुड्स, पौष्टिक आहार ही आणि तत्सम उत्पादने औषधांच्या गटात मोडत नाही. त्यामुळे अशी उत्पादने औषधांच्या दुकानात विक्रीस ठेवण्यावर बंदी घालण्याच्या विचार केंद्र सरकारने चालवला आहे.

औषधांच्या दुकानांवर सेरेलॅकसारखी बेबी फूड्स, हॉर्लिक्स, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी सोप, तेल, पावडर आणि अशाप्रकारची अनेक ब्रांड उत्पादने अधिक दराने विकल्या जात आहेत. अशाप्रकारची औषधांच्या गटात न मोडणारी उत्पादने किरणा व जनरल स्टोर्स मध्ये विकली जायला हवी आणि औषधांच्या दुकानात केवळ औषध आणि वैद्यकीय उत्पादने विकली जावीत.

देशभरात जनऔषधी केंद्र उभारण्यावर सरकारचा भर आहे. आयएमए आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने देशभरात येत्या २ वर्षात तीन हजार जनऔषधी केंद्रे उभारण्यात येतील. याप्रकारची केंद्रे केवळ आयएमएच्या १६०० शाखांमध्ये उघडली जातील.